प्रतिनिधी , अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत नगर मनमाड हायवे लगत भन्साळी ट्रॅक्टर. शोरूम जवळ अल्पवयीन मुलगी वय वर्ष 17 हिने आपल्या राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.या घटनेत आत्महत्या केलेल्या व्यक्तीची सख्खी बहीण प्रमुख आरोपी असल्याचे निदर्शनास आले आहे.आपले प्रेम प्रकरण उघड होऊ नये म्हणून आपल्या सख्ख्या बहिणीला गळफास देऊन तिने तिचे जीवन संपवण्याचा प्रकार उघड झाला आहे. सदर घटनेने कोपरगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मयत मुलगी हर्षदा नवनाथ बनकर वय 16 ही आपल्या राहत्या घरी पलंगाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आढळून आली होती या घटनेनंतर उलट सुलट चर्चांना उधाण आले होते परंतु पोलिसांच्या तपासात तिची सख्खी बहिण सृष्टी नवनाथ बनकर तिचा खून केल्याचे आढळून आले आहे. तिचा प्रियकर खंडाळा तालुका वैजापूर येथील आकाश कांगुने यांनी तिला मोबाईल फोन घेऊन दिला होता ही माहिती बहिणीने आपल्या आई-वडिलांना दिल्यामुळे आणि आपले प्रेम प्रकरण उघड झाल्याचा राग आल्याने सख्ख्या बहिणीने आपल्या बहिणीचा काटा काढला. याबाबत आरोपीच्या आईनेच पोलिसात फिर्याद देऊन आपल्या मुली विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले करीत आहेत.
