जनतेज न्युज

चंद्रकांत खैरे हा संपलेला विषय आहे – पालकमंत्री संदिपान भुमरे

प्रतिनिधी , औरंगाबाद : आज शुक्रवार 7 ऑक्टोंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे हे बैठकीच्या अनुषंगाने आज रोजी शहरात आले असून औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या कार्यालयामध्ये जाऊन आज पाहणी केली यावेळी स्मार्ट सिटी अंतर्गत चालणाऱ्या सर्व कामाविषयी त्यांनी स्मार्ट सिटी प्रशासक अभिजीत चौधरी यांच्याशी चर्चा केली शहराची सुरक्षितता कशी आहे कुठे कॅमेरे बसलेले आहेत मुलांच्या पाण्याचे नियोजन कसा आहे यावर चौकशी करत चर्चा केली यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना पालकमंत्री संदिपान भुमरे म्हणाले की,औरंगाबादचा पाणी प्रश्न मोठा असून त्या अनुषंगाने उपाययोजना सुरू असून लवकरात पाणीपुरवठ्याची पाईपलाईनचे काम पूर्ण होणार आहे यासाठी युद्धपातळीवरती काम सुरू असल्याची माहिती त्यांनी आज रोजी दिली आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळेच औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न गंभीर झालेला असून आज सुद्धा नागरिकांना पाचव्या दिवशी नळांना पाणी येत आहे,
मात्र आता एकनाथ शिंदे यांची सत्ता आल्यानंतर या योजनेचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली,
पाणीपुरवठ्या चे आणि पाईप लाईनचे बैठकीत दरम्यान चर्चा करणार असल्याची ही माहिती पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज रोजी दिली आहे.