जनतेज न्युज

बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यावर बजेट जलाओ आंदोलन

प्रतिनिधी, अमरावती :  बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय धोरणाचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर बजेट जलावा आंदोलन करण्यात आले. मागील वर्षी बीजेपी सरकारने बजेट सादर केले होते. त्यापेक्षाही कमी बजेट यावर्षी सादर करण्यात आले आहे. केंद्र सरकार शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक यांच्या हिताचा कुठलाही ठोस निर्णय घेतला नसल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने यावेळी करण्यात आला. सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही तर अधिक उग्र आंदोलन करण्याचा इशारा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने देण्यात आला.