जनतेज न्युज

बैलपोळा सणाच्या वेळी पोलिसांनी केलेल्या कारवाई निषेधार्थ खामगांव बंद – आ.ॲड.आकाश फुंडकर

प्रतिनिधी, बुलडाणा : येथे बैलपोळा सणाच्या वेळी झालेल्या घटनेत पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ उद्या सोमवार रोजी खामगाव शहरातील गणेश मंडळे विविध सामाजिक संघटना व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने खामगाव बंदची हाक देण्यात आली आहे.अशी माहिती खामगाव विधान सभा मतदार संघाचे आमदार ॲड.आकाश फुंडकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.खामगाव शहरात बैलपोळ्याच्या सणानिमित्त फरशी येथे बैलपोळा आयोजित करण्यात आला होता.परंतु या बैलपोळ्याच्या ठिकाणी इकड-दुक्कड होमगार्ड पोलीस बंदोबस्तात लावण्यात आले होते.तेथे हजारोची संख्या जमलेली असताना पोलीस प्रशासनातले जबाबदार अधिकारी हे सदर ठिकाणी उपस्थित नव्हते.त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेल्या काहींनी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणीं पोलिस बंदोबस्त असता जबाबदार अधिकारी हजर असते तर ही घटना घडलीच नसती..येणाऱ्या गणेशोत्सवाचे काळात खामगांव शहरात शांतता सुव्यवस्था ,जातीय सलोखा अबाधित राहावा या दृष्ट्रिने बेजबाबदारपणे वागणाऱ्या संबधित अप्पर पोलीस अधीक्षक , उपविभागीय पोलीस अधिकारी व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार या अधिकाऱ्यांना ऊत्सवकाळात दुर ठेवावे.बैलपोळा सणाच्या वेळी झालेल्या घटनेत पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ उद्या खामगांव बंदची हाक दिली आहे.सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार ॲड.आकाश फुंडकर यांनी केले आहे.