जनतेज न्युज

बाजारात गणेश मूर्तीचे आगमन मूर्तीं च्या किमतीत 30 ते 40 टक्के वाढ

प्रतिनिधी, जळगाव :  गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारात गणेश मूर्तींच्या आगमन झालेला आहे गेल्या दोन वर्षापासून गणेश मूर्तींचे उंचीवर निर्बंध लागू होते परंतु यावर्षी शासनाने गणेश मूर्तीची उंची वरील निर्बंध उठविल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे परंतु शासनाने निर्णय उशिराने घेतल्याने गणेश मूर्ती तयार करणारे कारागिरांना पुरेसा वेळ न मिळाल्याने गणेश मूर्तीची उंच मूर्ती बनविण्यासाठी वेळ अपुरा पडलेला असल्याने लहान मुर्त्यांची वेगवेगळ्या व्हरायटी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्याचप्रमाणे शासनाने प्रत्येक वस्तूवर जीएसटी लागू केल्याने गेल्या वर्षाच्या मानाने यावर्षी गणेश मूर्तींमध्ये तीस ते चाळीस टक्क्यांनी किमतीत वाढ झालेली आहे त्यामुळे गणेश मंडळातील गणेश भक्तांना किमती संदर्भात गणेश मूर्ती विक्रेत्यांना वारंवार तोंड द्यावा लागत आहे गणेश मूर्तींची बुकिंग अजून कमी प्रमाणावर झालेली आहे येणाऱ्या काही दिवसात गणेश मूर्तींचे बुकिंग मध्ये वाढ होईल अशी अपेक्षा गणेश मूर्ती विक्रेत्यांमध्ये दिसून येत आहे.