प्रतिनिधी, सांगली : सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यांतील महापुरासंदर्भात वेगवेगळ्या उपाययोजना शासनाला देऊन देखील शासनाकडून अंमलबाजवणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी आता आंदोलन छेडण्यात आलं आहे. सांगली गणपती मंदिराजवळ महाआरती करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने हा लढा उभा केला आहे. सततच्या महापुरामुळे पिकांचे नुकसान होत आहे. तसेच पशु हानी, आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर वेगवेगळ्या उपाययोजना शासनाने करुन देखील शासनाकडून अंमलबाजवणी करण्यात आलेली नाही.
