जनतेज न्युज

बकरी ईद उत्साहात साजरी

प्रतिनिधी , बीड : तब्बल दोन वर्षांनंतर बकरी ईदचा उत्साह मुस्लिम बांधवांमध्ये दिसून आला. बीड येथील ईदगाह मैदानावर आज सामूहिक नमाज अदा करण्यात आली. शहरातील बालेपीर नई ईदगाह, इस्लामपुरा पुरानी ईदगाह, मरकज मशिद जामा मशिद यासह इतर ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या वतीने नमाज अदा करण्यात आलीय. दोन वर्षानंतर बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय.  पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फुल देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस बंदोबस्त चोख लावण्यात आला होता.