जनतेज न्युज

बालाजी नगर परिसरातील नाईक शाळेमध्ये घुसले ड्रेनेजचे पाणी, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

प्रतिनिधी, औरंगाबाद : कर्मवीर शंकर सिंग नाईक हायस्कूल बालाजी नगर येथील शाळेच्या मैदानावर देवीची गाणी येऊन दुर्गंधी पसरली आहे गेल्या तीन वर्षापासून ड्रेनेजचे पाणी शाळेच्या मैदानामध्ये येत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे,
या प्रकरणी वेळोवेळी मनापा आरोग्य विभागाला स्मरणपत्रे दिले मात्र सदरील कार्यालयाकडून वेळ काढू पणा करण्यात येत असून शाळेतील परिसरात 80% ड्रेनेजचे पाणी आल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून मनपा याकडे दुर्लक्ष करीत आहे, आतापर्यंत वीस ते पंचवीस निवेदने आम्ही मनपाला दिले आहे परंतु मनपा याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नाही जास्त आज जिल्हाधिकारी यांना भेटून त्यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती शिक्षकांनी केली आहे जर लवकरात लवकर काम झाले नाही तर शाळेतील विद्यार्थी घेऊन मनपा आयुक्त त्यांच्या कार्यालयासमोर बसू असे शिक्षकांनी सांगितले.या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सदरील समस्या दूर करण्यात यावी असे सदरील शाळेचे मुख्याध्यापक यांनी सांगितले आहे