प्रतिनिधी, बुलढाणा : बुलडाणा शहरात बुलडाणा पोलिसांनी ट्रप लावून गोवंश जातीचे 9 बैल आणि ट्रक ताब्यात घेऊन दोन आरोपींना अटक केली आहे..या कारवाईत 7 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे..जळगाव जिल्ह्य़ातील वरणगाव येथील आरोपी शेख मुस्तकीन शेख अब्दुल कुरेशी व शेख सोहेल शेख बशीर हे 9 बैल ट्रक मध्ये कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याच्या उद्देशाने मिळून आले, चालक आणि वाहकाने उडवा उडवी चे उत्तर दिल्यामुळे ताब्यात घेऊन चौकशी करून बुलडाणा पोलिसांनी आरोपी विरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम 1995 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
