जनतेज न्युज

भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये अवैज्ञानिक विचारांची मांडणी कशासाठी ?- अतुल लोंढे

प्रतिनिधी , नागपूर : राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरू असलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये इंडियन वुमेन्स काँग्रेसच्या चर्चासत्रात अवैज्ञानिक आणि श्रद्धेला खतपाणी घालणारी मांडणी दोन महिलांनी केली. कांचन गडकरी यांनी हळदी कुंकवाचे महत्व सांगितले तर भाजपा नेत्या कल्पना पांडे यांनी घराबाहेर रांगोळी काढल्याने दुष्टशक्ती येत नाहीत असे सांगितले. रांगोळीने जर दुष्टशक्ती येत नसतील तर कांचन गडकरी आणि कल्पना पांडे यांना चीन, पाकिस्तानच्या सीमेवर पाठवून द्या आणि तिथे रांगोळ्या काढा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटल.