प्रतिनिधी , अमरावती : अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात भोई समाजाचा विदर्भस्तरीय उपवर वधू परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू बच्चू कडू यांनी एक मोठं वक्तव्य केलं, काळ जर चांगला राहिला प्रहार जर मजबुतीने समोर आली तर प्रहार संघटनेचा भोई समाजाचा पहिला आमदार राहिल्या शिवाय राहणार नाही असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं, आतापर्यंत सर्व समाजाचे आमदार झाले मात्र भोई समाजाचा आमदार झाला नाही अशी खंत देखील बच्चू कडू यांनी व्यक्त केली
तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत खोचक टीका केली,उद्धव ठाकरे सरकार मध्ये मी भटक्या विमुक्त जातीचा राज्यमंत्री होतो यात आह्माला अडीच वर्षे भेटले,या मध्ये उद्धवजीचा साक्षात्कार होता. चांगल्या गतीने ते काम करत होते त्यामुळे आमचे अडीच वर्षे वाया गेले असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला..
