जनतेज न्युज

बिलकिस बानो प्रकरणातील गुन्हेगारांना तुरुंगातून सोडले गेले या घटनेचा आझाद मैदान येथे निषेध

बानो प्रकरणातील गुन्हेगारांना तुरुंगातून सोडले गेले या घटनांचा निषेध करण्यासाठी मौलाना आझाद विचार मंचाच्या वतीने आज आझाद मैदान येथे निषेध आंदोलन करण्यात आले. मुख्यतः दलितांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून हल्लाबोल करण्यात आला. मोदी सरकार आल्यापासून सातत्याने दलितांवर अत्याचार चालले आहेत. घटनेमध्ये सर्वांना समान हक्क दिलेले आहेत त्या घटनेच्या नियमांना धाब्यावर बसवण्याचं काम हे सरकार सत्तेत आल्यापासून करत आहे. आणि कुठेनकुठेतरी देशात पुन्हा मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न चालू केला आहे, असे माजी खासदार हुसेन दलवाई यावेळी म्हणाले.