प्रतिनिधी, बुलडाणा : गेल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्राची हेडलाईन असलेलं बुलढाण्यातील दोन दिग्गजांच्या अपहरण प्रकरणाला आता नवीन वळण आले आहे..बुलढाणा अर्बन चे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांनी या तीनही युवकांना मोठं मन दाखवत माफ केलं असून आपल्या संस्थेत रोजगार देण्याचं किंवा व्यवसायासाठी कर्ज देण्याचा प्रस्ताव या तीनही युवकांच्या परिवारासमोर ठेवला आहे.जर हे बेरोजगार युवक अशा प्रकारचा कट करण्याची कल्पना करत असतील तर मी माझ्या संस्थेत त्यांना रोजगार देण्यास तयार आहे.हे युवक वयाने लहान असून त्यांना घडवण्यासाठी सामाजिक जबाबदारी घेत बुलढाणा अर्बन या युवकांच्या रोजगारासाठी प्रयत्न करेल.या निमित्ताने ते म्हणाले की अनेक युवक पदवी घेऊन पास झाले आहे.. कुठलेही काम करण्याची मनुववृत्ती ठेवली पाहिजे. कुठलेही काम करण्याची इच्छा असेल तर भारतामध्ये बऱ्याच प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे त्यामुळे कोणीच बेरोजगार राहू शकत नाही.फक्त काम करण्याची इच्छा पाहिजे असा संदेश राधेश्याम चांडक यांनी युवकांना दिला आहे.
