प्रतिनिधी, नागपुर : पी.एफ.आयवर कारवाई झाली याचा अर्थ असा आहे की, मोठ्या प्रमाणात या संदर्भातले वेगवेगळे पुरावे हे एनआयए, केंद्र आणि राज्य सरकार कडे उपलब्ध आहेत. या पुर्वी केरळ सारख्या सरकारने पी.एफ.आयच्या वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता त्याचा तपास चालु आहे. त्या तपासातुन अनेक गोष्टी बाहेर येतील. देशामध्ये अस्वस्थता तयार करण्याचे जे शडयंत्र होते. ते सगळं योग्यवेळी बाहेर येईल.
