जनतेज न्युज

चांदवड नगरपरिषद हद्दीतील कोंबडवाडी ते पाचड वस्तीत स्थानिकांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागतेय वणवण

प्रतिनिधी, नाशिक : चांदवड येथील कोंबडवाडी ते पाचड वस्ती या ठिकाणी असलेल्या शंभर ते दीडशे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कोंबडवाडी ते पाचड वस्ती या आदिवासी वस्तीवर दरवर्षी  जानेवारी महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तर या डोंगराळ भागातून आलेल्या झऱ्याच्या बारीक धारीच्या पाण्यावर येथील आदिवासी पाणी पिऊन दिवस काढत आहेत. मात्र  हे ठिकाण चांदवड नगर परिषदेच्या हद्दीत असून प्रशासन याकडे लक्ष देत नाही. फक्त मतदान मागण्यासाठी या ठिकाणी पुढारी  येतात आणि पाण्यासाच्या समस्येसाठी काही काम करत नाहीत असे येथील महिला सांगत आहेत. तसेच या ठिकाणी रात्री बे रात्री आम्हाला येण्या जाण्यासाठी रस्ता देखील व्यवस्थित नाही पाऊस सुरू झाल्यावर आम्हाला जंगलातून रस्ता शोधत घरापर्यंत पोहोचावे लागते, अशी खंत महिलांनी बोलून दाखवली आहे.