जनतेज न्युज

सुषमा अंधारेंना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची एवढी अलर्जी का?- संजीव भोर

प्रतिनिधी, मुंबई : काल बीड येथील झालेल्या सभेत भाषण करताना सुषमा अंधारेने अनेक महापुषांची नावे घेतली, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचे व शिवरायांना अभिवादन करण्याचे सुषमा अंधारे यांनी जाणीवपूर्वक टाळले. अंधारेंना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची एवढी अलर्जी का आहे? उद्धव गटाकडून वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराला आधीच मूठ माती दिली गेली, हिंदुत्वाशी त्यांनी फारकत घेतली आहे. आता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाबाबत उद्धव गटाच्या नेत्यांमध्ये आकस दिसून येतो आहे, यांना नक्की कोणत्या विचाराने पुढे जायचे आहे.