प्रतिनिधी, संभाजीनगर : शहरातील श्रीराम चौकात अज्ञात व्यक्तीने अंडी फोडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटना कळताच दूध डेरी ते दर्गा रोडवरील काल्डा कॉर्नर भागात असणाऱ्या या चौकात पोलिस पोहोचले. काल्डा कॉर्नर येथील चौकात धार्मिक स्थळाची निराशेने ग्रासलेल्या महिलेने देवालाच दोष देत प्रार्थना स्थळाची विटंबना केल्याची घटना घडली. सततच्या अपयशामुळे जीवनात आलेल्या अस्थैर्याचाचा दोष देवाला देत एका महिन्याने धार्मिक स्थळांची विटंबना केल्याचा प्रकार छत्रपती संभाजी नगर शहरात सकाळी साडेनऊ ते दहा दरम्यान उघडकीस आला. या महिलेने केलेल्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी त्वरित सूत्रे हलवत आरोपी महिलेस तीन तासात महिलेस ताब्यात घेतले. तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या अटकेत असलेल्या संबंधित महिलेचा हेतू धार्मिक तेढ निर्माण करण्याचा नव्हता स्वतःच्या आयुष्यात खचल्याने तिने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात केलेल्या आवाहनामुळे शांतेता कायम राहण्यास मदत झाली आहे.
