प्रतिनिधी, कल्याण : हवामान बदलाचा सामना करण्यासाठी आणि शहराचे हरित आच्छादन वाढवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतर्फे ०५ जूनच्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ” माझी बाग माझा परिसर ” या विषयाच्या अनुषंगाने एक अनोखी फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत आपल्या घरात घराच्या गॅलरीत व आपल्या अंगणात किव्हा घराच्या परिसरात झाडे लावून एक सुंदर बाग बनवत त्याचे फोटो पालिकेच्या वेबसाईटवर वर पाठवणाऱ्या नागरिकांना पालिका प्रशासन स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देत त्याचे फोटो पालिकेच्या सोशल मीडिया हँडलवर देखील प्रकाशित करणार आहे. ही स्पर्धा 29 मे पर्यंत राहणार असून ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच हा अनोखा उपक्रम असल्याचे पालिका आयुक्ताने सांगतले आहे . जास्तीत जास्त लोकांनी या मध्ये सहभाग घ्यावा असे आव्हान पालिके कडून करण्यात आले आहे.
