जनतेज न्युज

चार दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन, खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन

प्रतिनिधी, बीड : बीडमध्ये संभाजी महाराज क्रीडा संकुलात चार दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. खासदार प्रीतम मुंडे, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ आणि कृषी अधिकाऱ्यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले आहे. आज पहिल्याच दिवशी कृषी महोत्सवात शेतकऱ्यांसह नागरिकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली आहे. एकूण जवळपास 200 स्टॉल्स इथे लावण्यात आले असून शेतकऱ्यांसाठी उपयोगी वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. चार दिवस चालणाऱ्या या कृषी महोत्सवाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार मुंडे यांनी केले आहे. तर शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या कृषी महोत्सवात शेतकरी समुपदेशन केंद्र उभारण्याची गरज असल्याचं मुंडे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.