प्रतिनिधी,नवी मुंबई: मयत नवऱ्याचे इन्शुरन्स चे पैसे परस्पर आपल्या खात्यात वळविले म्हणून वाशी पोलीस ठाण्यात फसविणूकीचा गुन्हा दाखल झाला.पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून,चौकशीतून प्रकरण समोर आले.एका महिलेचा नवरा मयत झाल्यावर त्याच्या इन्शुरन्सचे पैसे मिळावे म्हणून तिने एका ओळखीच्या व्यक्तीला मदत करण्यास सांगितले.त्याने आपल्या एका मित्राच्या नावाने बोगस खाते उघडून मिळालेले इन्शुरन्सचे पैसे त्याच्या खात्यात वळते कुरून ते आपल्या खात्यात वळेविले.मराठी येत नसल्याचा आणि ओळखीचा फायदा घेत विधवा महीलेले ६४ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी आणि यासाठी मदत करणाऱ्या अन्य तीन जण,असे एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून,ते आता पोलीस कोठडीत असून,पुढील तपास सुरू आहे.किरण औंद,निखिल थोरवे,भास्कर लांडगे आणि समुअल्स संपत कुमार अशी आरोपींची नावे असून यातील समुअल्स संपत कुमार या आरोपीवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
