प्रतिनिधी,पुणे : पुणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त खंडणीखोर माहिती अधिकार कार्यकर्ता रमेश खामकर यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला. मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत आहेत. रमेश खामकर यांनी त्यांच्या वकिलामार्फत शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलेला होता तथापि अनुसूचित जातीतील चर्मकार समाजावर झालेल्या अत्याचाराची दखल न्यायालयाने घेतली असून रमेश खामकर यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आलेला आहे.
खंडणीखोर माहिती अधिकार कार्यकर्ता रमेश खामकर यांनी चर्मकार समाजातील गटई कामगार श्री सुनील चराटे यांना एलबीटी कार्यालय येथे गटई काम करायचे असेल तर दर महिना दोन हजार रुपयांची मागणी करून ते पैसे न दिल्यास पुणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाला सांगून कारवाई करण्याची धमकी देण्यात आलेली होती. चर्मकार समाजावरील अन्याय अत्याचाराचा प्रकार मागील सहा महिन्यांपासून सुरू होता .अखेर फिर्यादी सुनील चराटे यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे श्री रमेश खामकर यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी अंतर्गत तक्रार दिली. शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी सर्व वस्तुस्थिती पाहून श्री रमेश खामकर यांच्याविरुद्ध खंडणी व ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. श्री रमेश खामकर यांनी जिल्हा व सत्र न्यायालय पुणे येथे जामीनासाठी अर्ज केल्यानंतर मागील चार महिन्यांमध्ये आठ वकील बदलले आहेत तसेच दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी नो- सेची ऑर्डर करावी म्हणून श्री खामकर यांच्या वकिलाने न्यायालयात म्हणणे सादर केले. तथापि फिर्यादी सुनील चराटे यांचे वकील एडवोकेट अंबादास बनसोडे यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्ह्याचे वर्णन, सर्वोच्च न्यायालयातील निदेश ,ॲट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी यांचा अभ्यासपूर्ण युक्तीवाद न्यायालयात केला. जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश श्री. रामटेके यांनी एडवोकेट अंबादास बनसोडे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून श्री रमेश खामकर यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे.
दरम्यान श्री रमेश खामकर फरार असून पोलिसांनी त्यांना अद्याप पर्यंत अटक करण्यात आले नाही .जोपर्यंत त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नसून पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांच्या कार्यालयावर उपोषण , धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
