प्रतिनिधी , ठाणे : वाहतूक पोलिसांचा वाढते काम आणि धावपळ पाहता झेप्टो कंपनी कडून ट्रॅफिक चौकी उपलब्ध करून दिली आहे. ठाण्यातील तीन हात नाका ब्रीज येथे या ट्रॅफिक चौकीचे उद्घाटन ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता हे उद्घाटन करण्यात आले. या झेप्टो कंपनीकडून वाहतूक पोलिसांना आणखी अशाच प्रकारच्या चौकी वाटप करण्यात येणार आहेत.
