जनतेज न्युज

चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

प्रतिनिधी, बुलडाणा : चराई क्षेत्र उपलब्ध करून पासेस तात्काळ करून द्यावे. मेंढपाळावरील खोटे गुन्हे रद्द करावे. धनगर समाजा साठी पशुपालन निधी  उपलब्ध करावा.शेळी -मेंढीसाठी शासकीय विमा पॉलिसी देण्यात यावी. या अन्य मागण्यासाठी आज बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात रास्ता रोको करण्यात आला होता.जय मल्हार नवयुग सेनेचे प्रदेशाध्यक्ष नांदेड लवंगे यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हजारो शेळ्या- मेंढ्या या मोर्चात धनगर समाजाच्या वतीने आणण्यात आल्या होत्या यावेळी धनगर समाजाचे नागरिक उपस्थित झाले होते..यावेळी तब्बल 2 तास वाहतूक खोळंबली होती..तसेच तात्काळ मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.