जनतेज न्युज

महावितरण कार्यालय शेतकऱ्यांना जळालेले ट्रान्सफार्मर भरून देईना; ट्रान्सफार्मर चोरीला गेल्याचा गावकऱ्यांचा आरोप

प्रतिनिधी, जालना : जालन्यातील मस्तगड येथील महावितरण कार्यालयातून विजेचे ट्रान्सफार्मर चोरीला गेल्याचा आरोप बदनापूर तालुक्यातील ग्रामस्थांनी केला आहे.पानेवाडी गावच्या ग्रामस्थांसह आजूबाजुच्या ग्रामस्थांनी गावातील जळालेले ट्रान्सफार्मर दुरुस्तीसाठी मस्तगड येथील महावितरण कार्यालयात जमा करण्यात आले होते.मात्र दुरूस्त करण्याआधीच हे ट्रान्सफार्मर महावितरण कार्यालयातून चोरीला गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. एक दोन नव्हे तर 100 ट्रान्सफार्मर चोरीला गेले असून यामुळेच महावितरणचे अधिकारी हे ट्रान्सफार्मर देत नसल्याचा आरोप या गावकऱ्यांनी केला.