जनतेज न्युज

पोलिसांचे वाहन दिसताच पुर बघण्यासाठी आलेल्या नागरिकांची धावपळ

प्रतिनिधी, चंद्रपूर : ब्रम्हपुरी-आरमोरी रस्त्यावरील वैनगंगा नदीच्या पुलावरून व किन्ही-बेटाळा गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने ब्रम्हपुरीचे ठाणेदार रोशन यादव यांनी त्याठिकाणी जाऊन नागरिकांनी पुलावरून पाणी वाहत असल्याने आवागमन करू नये यासाठी नागरिकांना आवाहन केले.यावेळी वाहतूक पोलीस अंमलदार राहुल लाखे, महेश कोरे हे उपस्थित होते. यावेळी बरेच नागरिक पुलावर गर्दी करून होते. व काही जण पाण्यात जाऊन सेल्फी फोटो काढत होते. तेव्हा पोलीसांचे वाहन बघताच सर्व जण पळायला लागले. तेव्हा ठाणेदार रोशन यादव यांनी नागरिकांची समजूत काढत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुराच्या पाण्यात जाण्याचे टाळावे अशी विनंती केली.ब्रम्हपुरी-आरमोरी मार्ग पुर्णतः बंद असल्याने ठाणेदार रोशन यादव हे आपल्या कर्मचाऱ्यांसह ब्रम्हपुरी-वडसा-आरमोरी असा प्रवास