प्रतिनिधी, अहमदनगर : भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने पूर्ण देशात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने संगमनेर तालुका अमृत महोत्सव अतिशय लोकांनी उत्साहात साजरा करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरूळ यांनी केले आहे. अमृत महोत्सव निमित्त संगमनेर शहरात महसूल विभागातर्फे व पोलीस विभागातर्फे प्रभात फेरी काढण्यात आली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यांनी सांगितले की अमृत महोत्सव निमित्त सर्वांनी घरावरती झेंडा फडकून देशाचा 75 वर्ष अभिमानाने साजरा करावा, असे आवाहन नागरिकांना केले. तसेच सर्व नागरिकांना महसूल विभागातर्फे अमृत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रांत अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांनी दिले आहेत.
