प्रतिनिधी, जळगाव : स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालय यांचा वतीने विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढून वीर जवान नानाभाऊ सैदांणे यांचे गावी नागलवाडी येथे असलेले स्मारकाला पुष्पा चक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सायकल रॅलीला कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालय येथून प्राचार्य सूर्यवंशी यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. रॅली महाविद्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक थाळनेर दरवाजा चौक मार्गाने नागलवाडी या गावी पोहोचली. या रॅलीमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी, प्राध्यापक, माजी सैनिक आदी सहभाग झाले होते. नागलवाडी येथे वीर जवान नानाभाऊ सैंदाणे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी माल्याअर्पण केले. तर, वीर जवान नानाभाऊ सैंदाणे यांची विर पत्नी नीता सैंदाणे व आशाताई पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
