प्रतिनिधी , जळगाव : ईनरव्हील क्लब ऑफ चोपडा व भगिनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रौढ साक्षर वर्गाच्या शुभारंभ करण्यात आला ज्या महिलांना शिक्षण घेता आलं नाही किंवा ज्या महिलांना अंक व अक्षराची ओळख नाही अशा महिलांसाठी प्रौढसाक्षर वर्गाचा शुभारंभ करण्यात आला या वर्गांसाठी जवळपास 50 महिलांनी सहभाग घेतला या महिलांना शैक्षणिक साहित्य यांच्या वाटप करण्यात आले या महिलांमध्ये शिक्षणाची व कमीत कमी आम्हाला आमची स्वाक्षरी करता आली तरी खूप आहे असा हा उत्साह सर्व वयोवृद्ध महिलांमध्ये दिसून येत होता शिक्षणाला वयाची मर्यादा नसते शिक्षण केव्हाही घेऊ शकतो आपली फक्त इच्छाशक्ती आणि जिद्द हवी ती इच्छाशक्ती व जिद्द या महिलांमध्ये दिसत होती या प्रौढसाक्षर वर्गाला उडान असं नाव देण्यात आलं कार्यक्रमाला भगिनी मंडळ संस्थेचे अध्यक्ष पूनम गुजराती उपाध्यक्ष छायाबेन गुजराती प्रभा काकी गुजराती ईनरव्हील क्लब च्या प्रेसिडेंट नीता अग्रवाल मुख्याध्यापक सुनील चौधरी आशिष गुजराती अरुण संदाशिव यांच्यासह भगिनी मंडळ व इनरव्हील क्लब चे पदाधिकारी व प्रौढसाक्षर उडान या वर्गात सहभागी होणाऱ्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
