जनतेज न्युज

चिखली एमआयडीसीमधील गोदामाला लागली भीषण आग

प्रतिनिधी, बुलडाणा : चिखली एमआयडीसी मधील एका गोदामाला आज आग लागली. घटनास्थळी चिखली अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील मेहकर राज्य महामार्गावर राज्य औद्योगिक वसाहत आहे. या ठिकाणी चिखली येथील व्यापारी अभय जैन यांचे गोदाम आहे. या गोदामाला आज दुपारी अचानक आग लागली. पाहतापहाता ही आग भडकली. दरम्यान याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची चार वाहने घटनास्थळी दाखल झाली. दलाचे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते आहे.