जनतेज न्युज

नगरपरिषदेमार्फत बांधण्यात आलेल्या व्यायाम शाळेची चौकशी करून आठवडाभरात सुरू करणार

प्रतिनिधी, बुलडाणा : बुलढाणा शहरातील मुस्लिम बहुल भागात युवकांसाठी मिर्झा नगरच्या उर्दु शाळेच्या परिसरात बुलढाणा नगर परिषदेने ३२ लाख रुपये खर्च करुन ‘टिपू सुलतान’ यांच्या नावाने नवीन उभारण्यात आलेली व्यायाम शाळा गेल्या एक वर्षांपासून बंदच असल्याने  परिसरातील युवकांमध्ये बुलढाणा नगर परिषदेच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात आला आहे. व्यायाम शाळा ८ दिवसात सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर नगर परिषदेमार्फत बांधण्यात आलेल्या व्यायाम शाळा चौकशी करून आठवडाभरात सुरू करणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी दिली आहे.