प्रतिनिधी, संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर, काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत असून महाराजांची राहुल गांधी सारख्या नेत्याशी तुलना होऊच शकत नाही असे असताना देखील काँग्रेस पक्षाने हे ,साहस केले आहे. त्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले.
