जनतेज न्युज

कन्नड येथे “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाचे 26 मे रोजी आयोजन

प्रतिनिधी, संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र शासनातर्फे “शासन आपल्या दारी” हा कार्यक्रम कन्नड येथे 26 मे रोजी घेण्यात येणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी दीड लाख नागरिक येणार असून या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी सर्व तपासणी मोफत केली जातील याचा लाभ सर्वांनी घ्यावा यासाठी जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.