प्रतिनिधी, नागपुर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव जेव्हा ही येते तेव्हा ही डोळ्यासमोर त्यांच्या सोबतचा चरखाही आठवतो. नागपूरचे रहिवासी जयंत तांदुळकर यांनी देशातील सर्वात लहान चरखा बनवण्याचा विक्रम केला आहे. हा चरखा इतका लहान आहे की, ते पाहण्यासाठी तुम्हाला भिंगाची गरज पडते. हा चरखा मोठ्या चरखाप्रमाणे काम करतो. या चरख्यापासून धागाही बनवता येतो. या चरख्याची लांबी 3.20 मिमी, रुंदी 2.68 मिमी, उंची 3.06 मिमी आणि त्याचे वजन 40 mg म्हणजेच 0.04 ग्रॅम आहे. या चरख्याचे नाव लिम्का बुकमध्ये देशातील सर्वात लहान चरखा म्हणून नोंदवले गेले आहे. तांदुळकर यांनी अवघ्या 8 तासात हा चरखा बनवला आहे. जयंतने आता त्यापेक्षा छोटा चरखा बनवला आहे. या चरख्याची लांबी 2.94 मिमी, रुंदी 2.40 मिमी, उंची 2.74 मिमी, वजन 30 मिलीग्राम म्हणजेच 0.03 ग्रॅम आहे. ज्याचे नाव जयंतला गिनीज बुकमध्ये नोंदवायचे आहे. जयंतला अशा अनेक छोट्या – छोट्या गोष्टी बनवण्याची आवड आहे. जयंत सांगतो की, त्याला लहानपणापासून हा छंद होता, तो छंद इतका वाढला की, जयंतने अनेक गोष्टी बनवल्या. जयंत सांगतो की, या सर्व गोष्टी तो विक्रीसाठी नव्हे तर छंद म्हणून करतो. तांदुळकरांना चरखा बनवण्याची प्रेरणा भारताच्या पंतप्रधानांकडून मिळाली. महात्मा गांधींनी ज्याप्रमाणे चरखा फिरवून स्वावलंबी होण्यास सांगितले, त्याचप्रमाणे विद्यमान पंतप्रधानांनीही स्वावलंबी बनण्यास सांगितले आहे.
