जनतेज न्युज

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी नरेंद्र पाटील तर उपसभापती पदी विनायक चव्हाण यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी, जळगाव : चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती ची निवड प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी दोन नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते, तर उपसभापती पदासाठी तीन नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. सभापती पदासाठी एक नाम निर्देशन पत्र माघार घेतल्याने नरेंद्र पाटील हे सभापती पदासाठी बिनविरोध निवडून आले तर उपसभापती पदासाठी दोन नामनिर्देशन पत्र माघार घेतल्याने विनायक चव्हाण यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली याप्रमाणे सभापती व उपसभापती निवडीची प्रक्रिया पार पडली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस एफ गायकवाड यांनी सांगितले.