प्रतिनिधी, चोपडा : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीचे मतदान आज सुरू आहे 21 जागांपैकी 12 जागा ंसाठी मतदान होत आहे या आधीच नऊ जागा बिनविरोध झालेले आहेत या मतदानासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती यांनी कुटुंबासह आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी सांगितलं मतदारांमध्ये उत्साह चांगला आहे चांगल्या मतांनी सहकार पॅनल निवडून येईल. जास्त जास्त मतदान व्हावं यासाठी ऊस उत्पादक आणि सभासदांना विनंती करतो असे सांगितले. * महाराष्ट्राचा राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्या राजीनामा मंजूर संदर्भात महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती यांनी सांगितले की राजीनामा मंजूर झाला आहे मला माहिती नाही कोणत्या तारखेला झाला परंतु ते वादग्रस्त आहेत हे मात्र वस्तुस्थिती आहे ती काही नाकारता येणार नाही.
