जनतेज न्युज

देशद्रोहींना हे सरकार कधीच माफ करणार नाही:- रावसाहेब दानवे

प्रतिनिधी , जळगाव : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे आज जामनेर येथे सेवा समर्पण अभियानासाठी आले होते, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला देशद्रोह्यांना हे सरकार कधीही माफ करणार नाही ,असे त्यांनी स्पष्टपणे वक्तव्य केले आहे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे आता भाजपमध्ये येणे शक्य नसून त्यांच्या रस्ता वेगळा आहे, आमचा रस्ता वेगळा आहे व एकनाथराव खडसे हे माझे जरी चांगले मित्र असले तरी त्यांचे विचार वेगळे व आमचे विचार वेगळे असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे,