जनतेज न्युज

राज ठाकरे यांच्यावर टिका केली तर जश्याच तसे उत्तर देण्यात येईल – आदित्य दुरुगकर विदर्भप्रभारी मनसे

प्रतिनिधी , नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्यावर आता वाद निर्माण होत आहे.राज ठाकरे हे नागपुर दौऱ्यावर आले असता त्यांनी वेगळा विदर्भ संदर्भात वक्तव्य केले होते की ‘ विदर्भासाठी निवडणूका घ्या त्यात जनतेचा कौल माहीत पडेल’. त्यावर विदर्भवादी नेते अविनाश काकडे यांनी राज ठाकरे वर टीका करत बोले की जेव्हा त्यांनी मनसे निर्माण केली होती तेव्हा जनतेचा कौल घेतला होता का. राज ठाकरे यांची भूमिका नेहमी दुटप्पी राहिली आहे. कधी काही तर कधी काही बोलतात.अविनाश काकडे यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विदर्भप्रभारी आदित्य दुरुगकर यांनी सांगितले की काकडे सारखे व्यक्ती स्वतःला मोठे करण्यासाठी मोठया नेतेच्या विरोधात वक्तव्य करतात.काकडे ने स्वतःच्या कर्तृत्वाने मोठे व्हावे यासाठी लोकांवर टीका करून तर दुसरीकडे काकडेचे वडील यांनी महाराष्ट्र होण्यासाठी 3 महिने तुरुंगात राहिले त्याचा पोटी अविनाश काकडे सारख मूल जन्माला येणे हे त्यांचा दृभाग्य आहे. राज ठाकरे यांच्यावर टिका केली तर जश्याच तसे उत्तर देण्यात येईल.