जनतेज न्युज

दिल्लीला जाणं हे मुख्यमंत्र्यांचं कामच असतं – मंत्री गुलाबराव पाटील

प्रतिनिधी , जळगाव : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक प्रश्नांची मांडणी केली होती, या प्रश्नांना जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्याला वेळ पूर्ण मिळाली नसल्याने खडसे यांनी मांडलेल्या विषयांना आपल्याला उत्तर देता आलं नसल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केलीय. जर आपल्याला वेळ मिळाला असता तर आपण वीट का जवाब पत्थर से दिला असल्याचं मत त्यांनी पाळधी येथे व्यक्त केलंय.