जनतेज न्युज

राष्ट्रवादीकडून पुण्यात पडळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल

प्रतिनिधी, पुणे : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे गळ्यात भगवी मफलर घालून शिवसेनेच्या घोषणा देतात. असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत केले होते. याशिवाय आमदार उदय सामंत यांच्यावर पुण्यात जो हल्ला झाला तो राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी केला. असे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. या विधाना विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून पुण्यात विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गोपीचंद पडळकर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची सभा ज्या ठिकाणी होते तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अग्रेसर दस्त होते. पुण्यामध्ये आदित्य ठाकरेंची सभा झाल्या नंतर आमदार उदय सामंत यांच्यावर हल्ला झाला तो शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी केला नसून तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पुण्यामध्ये शिवसेना एवढी प्रबळ नाही म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आदित्य ठाकरेंच्या सभेमध्ये सहभागी झाले होते. सभा संपल्यानंतर उदय सामंत यांच्यावर हल्ला करण्यात आला . लया वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.

भाजपने ज्यांना नेहमी बोंबाबोंब करायला आणि शिमगा उभे करायला ठेवला आहे. ज्यांच्या गावात त्यांची लायकी नाही ज्यांच्यावर चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत. असे गोपीचंद पडळकर यांनी काल एक बालिशपणाच आणि राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा वक्तव्य केलं त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे आम्ही तक्रार नोंद केली आहे.