प्रतिनिधी, पुणे : कागो देशातील महिलेने तसेच तिच्या साथीदाराने वाकड येथील घटस्फोटीत महिलेची मेट्रोमोनियल साइटवर फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार वाकड पोलिस स्टेशन येथे घडली आहे. मेट्रोमोनियल साईट वरून घटस्फोटीत महिलेला बनावट नावाने संपर्क करून तसेच अमेरिकेत कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर असल्याचे भासवत, घटस्फोटीत महिलेच विश्वास संपादन करून तिला लग्न करण्याचं आमिष दाखवून, तिची जवळपास 12 लाख 29 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यान विरोधात पुण्यातील वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
