प्रतिनिधी: नुकत्याच झालेल्या राज्यातील दुसऱ्या टप्याच्या ग्रामपंचायत निवडनुकीचा निकाल लागला आणि या निवडनुकीत लोकनियुक्त सरपंच पदाला महत्व दिले गेले. मात्र सदस्यांच्या विजयाकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. यामूळे लोकशाहीत या सदस्यांचे महत्व कमी झाले आहे. यासाठी या ग्रामपंचायत सदस्याचे कामकाजात अधिकार वाढवावेत. शासन नियमावलीत तसे बदल करावेत अशी मागणी आज ऑल इंडिया शेड्युल्ड काष्ट चे राज्य समन्वयक के.के.कांबळे गारगोटी यांनी केले.त्याचबरोबर हेदवडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मारूती खोत यांनीही याबाबत शासनाने फेरविचार करावा व लोकनियुक्त सरपंच पदाबरोबरच ग्रामपंचायत सदस्यांनाही काही अधिकार बहाल करावेत अशी मागणी आमच्या प्रेस मिडियाशी बोलताना केली.
