जनतेज न्युज

हर घर तिरंगा संदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची पत्रकार परिषद

प्रतिनिधी, औरंगाबाद : आज सोमवार एक ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात हर घर तिरंगा ही योजना राबवण्यात येणार असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायत मध्ये तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात येणार असून नागरिकांसाठी आपल्या घरावरती 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत तिरंगा ध्वज आपल्या घरावरती लावावा. मात्र कार्यालय आणि दुकानदारांसाठी हे ध्वज लावून रोज काढावे लागणार असल्याची माहिती आज रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदे त सदरील माहिती दिली आहे,
देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण देशात हर घर तिरंगा ही योजना राबविण्यात येत आहे यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज रोजी केले आहे.