जनतेज न्युज

आईच मुलीला करत होती जबर मारहाण,घटनेचा व्हिडिओ समोर

प्रतिनिधी, नवी मुंबई : पनवेल मध्ये एक विचित्र घटना घडली असून,नवीन पनवेल मधील चैतन्य सोसायटीत एका 5 वर्षाच्या मुलीला आपली सख्खी आई,अत्याचार,शारीरिक आणि मानसिक छळ करीत असल्याची घटना उघडकीस आली आहे.या चिमुरडीला बांधून ठेवणे,उपाशी ठेवणे,सतत मारहाण करणे या सारख्या आमनुष पद्धतीने त्रास देत असल्याचे समोर आले आहे.मागील खूप दिवसापासून सुरू असलेला हा निर्दयी प्रकार सोसायटीतील एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद करून तेथील एका सामजिक कार्यकर्त्या चित्रा देशमुख यांच्या निदर्शनास आणले. त्यानंतर चित्रा देशमुख यांनी खांदेश्वर पोलीस गुन्हे अन्वेषण विभागाच्या निरीक्षक वैशाली गलांडे यांना जाऊन कळविले असता,त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेऊन हा सर्व प्रकार बघितला असता,मुलीच्या आईला ताब्यात घेतले.पुढील तपास पोलीस करत असून,त्या प्रमाणे पुढील कारवाई सुरू असून मुलीची या अमानुष आईकडून सुटका केली आहे.