जनतेज न्युज

हिंदूगर्वगर्जनेच्या माध्यमातून शिंदे गटाचे शक्ती प्रदर्शन

प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : शिंदे गटाच्या वतीने डोंबिवलीत हिंदूगर्वगर्जना शिवसेनेच्या संपर्कयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहर प्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, दिपेश म्हात्रे आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक या मेळाव्याला उपस्थित होते.
यावेळी दादा भुसे यांनी आपल्या भाषणात उपस्थितांची गर्दी पाहून हा मेळावा दसरा मेळाव्याचा ट्रेलर असून दसरा मेळाव्याला कोणतं मोठं मैदान शोधावं हा प्रश्न पडला असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं. एनडीआरएफ च्या निकषात डबल ने मदत केली जाणार आहे.
कल्याण शीळ रोडवरील आंदोलन केलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात अहवाल मंगळवारपर्यंत येईन आणि शेतकऱ्यांना मोबदला दिला जाईल. असे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.