प्रतिनिधी, अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील वर्षभरापूर्वी मिळालेली डिजिटल एक्सरे मशीनचा वापर बंद होता. आज अखेर डिजिटल एक्सरे मशीन रुग्णांसाठी सुरू झाली आहे. या डिजिटल एक्सरे मशीनमुळे रुग्ण तसेच डॉक्टरांच्या वेळेची बचत होणार आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारचे एक्सरे काढणे, तसेच एक्सरे फिल्मची गुणवत्ता चांगली असल्याने योग्य निदान करण्यास मदत होणार आहे. रुग्णांना एक्सरेसाठी वाट पाहावी लागणार नाही, रुग्णांचा अहवाल हा सहजरित्या कॉम्प्युटरमध्ये स्टोअर होईल. अशी प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली आहे.
