प्रतिनिधी , बुलडाणा : राजकारणातील स्पर्धा,कोणाकडे लोक जास्त, कोण मंत्री पदावर व्यस्त,कोण स्वतःच्या सेटलमेंटमध्ये व्यस्त आहे..कोण म्हणतेय खोके, कोण म्हणतेय गद्दार..कोण म्हणतेय तुम्ही गद्दारी केली..या तुमच्या भांडणांमुळे आमचा शेतकरी मरतोय..त्याच्याकडे कोणी बघणार आहे की नाही. विदर्भातील शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे..अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दसरा मेळाव्यावर पत्रकार परिषदेत दिली आहे.. तर जयदेव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे..आणि पुढे बोलताना ते म्हणाले की, जयदेव ठाकरे यांनी कधी शेती केली का? त्यांना भुईमूग च्या शेंगा खाली लागतात की वर लागतात हे माहीत आहे का? AC मध्ये बसुन शेतातील काय कळणार आहे?जयदेव ठाकरे तुम्ही खाणारे अन्न अंबानी अदानी च्या कारखान्यातील नाही ..यानंतर जयदेव ठाकरे सारख्या बांडगुळनी जर का इथुन पुढे शेतकऱ्यांबाबत वाईट शब्द वापरण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तशा शब्दात उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.
