प्रतिनिधी, सोलापूर : गेल्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी शरद पवारांनी मस्ती केली. यावर्षी शरद पवार का नाही आले. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. बारा वर्षे केंद्रात मंत्री होते. ते पण आता आले होते मागं कधी होता मला माहिती नाही. गेल्या वर्षी त्यांना आपली चौंडी काढून घ्यायची होती त्यामुळे तुमच्या परिवर्तनाचे केंद्र असणारे चौंडी जागृत ठेवली पाहिजे अस आवाहन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना केल आहे.सोलापुरच्या मंद्रूपमधील धनगर समाजाच्या बैठकीत ते बोलत होते.- जेजुरी देवस्थान मध्ये अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवला. जेजुरी संस्थान आणि शरद पवारांचा काही संबंध नाही. जेजुरी संस्थान हे होळकरांची जागीरदारी आहे. जेजुरी संस्थान येथील अहिल्याबाई होळकर यांचे पुतळ्याचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार अशी पत्रिका आली. त्याच वेळी मला कळले होते. काही तरी मोठा गेम चालू आहे. मात्र पहाटे तरुणांना सांगून पुतळ्याचे मी उद्घाटन केले. सांगलीतले तेच केले?- गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या वर सडकून टीका केली. रोहित पवार हे जयंतीच्या दिवशी प्रसाद वाटत होते. रोहित पवार यांचा उल्लेख माकडा असा करत धनगरांच्या घरी वर्षाला पाच बोकड कापतात तुला माहिती नाही का, तुम्ही आता आयुष्यभर प्रसाद वाटायच्या कामाला आहात, असा खडा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला.
