जनतेज न्युज

झाडू अन् व्हॅक्युम क्लिनरच्या जमान्यातही केरसुणीचा मान कायम झाडू विक्रीस दाखल; ८० रुपये जोडी सध्या झाडूची किमंत

प्रतिनिधी, वर्धा : झाडू, मॉप, रोपो क्लिनर आणि व्हॅक्युम क्लिनरच्या जमान्यातही लक्ष्मी स्वरुप मानल्या जाणार्याी पारंपरिक केरसुणीने आपला मान कायम ठेवला आहे.
पावसामुळे केरसुणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य भिजल्याने केरसुणीचे भाव २० टक्क्यांनी वाढले आहेत. असे असतानाही मोठ्या कष्टाने केरसुणी बनविणार्यात कारागिरांच्या हाती फार काही पडत नाही. वर्ध्यातील स्थानिक केरसुणी बनविणार्या् महिला या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिवस भर बसून झाडू बनून आपला उदरनिर्वाह करीत आहे. परंतु ८० रू. किंमतीच्या झाडूला सुध्दा ग्राहक भाव करून नेत असल्याने हाती काही पडत नसल्याचे झाडू विक्रेता यांनी सांगितलं.