प्रतिनिधी, बुलडाणा : पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे पणत्याची सुद्धा भाव वाढले. नवरात्रोत्सव नंतर दिवाळीची चाहुल प्रत्येकाला लागते. त्यामुळे दिवाळीसाठी आवश्यक वस्तूंनी सध्या बाजारपेठा सजू लागल्या आहेत. दिवाळी हा प्रामुख्याने प्रकाशाचा सण असल्यामुळे दिवाळीला पणती आणि आकाश कंदिलांना खास महत्त्व असते.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये सध्या पारंपारिक पणत्यांसोबतच विविध आकारातील पणत्या विक्रीसाठी आल्या असून पेट्रोल डिझेल च्या दरवाढीमुळे त्यांची खरेदी करण्यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे.
दिवाळी हा प्रामुख्याने दिव्यांचा प्रकाशाचा आहे. दिवाळीमध्ये घर, अंगण हे दिव्यांनी उजळून निघते. या सणाच्या निमित्ताने पणत्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या या उत्सवासाठी बाजारपेठही हळूहळू सज्ज होत असून ठिकठिकाणी पणत्यांचे स्टॉल लागले आहेत.याठिकाणी पारंपारिक पणतीशिवाय चिनी मातीपासून तयार केलेल्या पणत्या,तुळस वृंदावन, कमळ फुलांच्या, प्राण्यांच्या आकारातील लहान मोठ्या पणत्या, रंगबेरंगी आकारातील पणत्या, अशा विविध आकारातील व प्रकारातील पणत्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे पण त्याचे भाव सुद्धा वाढले असून त्यांची खरेदी करण्यासही ग्राहकांची गर्दी होत आहे.
