प्रतिनिधी, यवतमाळ : हृदयाच्या कप्प्यात माणुसकीची भिंत असावी, समाजाचे ऋण ती फेडताना दिसावी. अगदी याच उक्तीप्रमाणे भाजप महिला सक्षमीकरण तसेच युवा फाउंडेशन यांच्या वतीने आमदार मदन येरावार तसेच जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या मार्गदर्शनात दिवाळी स्पेशल जुने कपडे संकलन मोहीम राबविण्यात येत आहे.
नऊ ते सोळा ऑक्टोबरपर्यंत आपल्या जवळील असलेले जुन्या कपड्यांचे संकलन भाजप महिला सक्षमीकरण, पोलिस मित्र सोसायटी लोहारा, यवतमाळ येथे करण्यात येत आहे. दिले जाणारे कपडे स्वच्छ व प्रेस करून गरजूंना योग्यरित्या 20 ऑक्टोबरला वाटप करण्यात येईल. यात सहभागी होण्याचे आवाहन महिला सक्षमीकरण केंद्राच्या संचालिका तसेच भाजप जिल्हा सचिव शैला मिर्झापुरे यांनी केले आहे.
